कंगना रणौत यांना विमानतळावर महिला शिपायाने थोबाडीत मारली !

शिपाई निलंबित : गुन्हाही नोंद

अभिनेत्री कंगना रणौत आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला शिपाई कुलविंदर कौर

चंडीगड – येथील विमानतळावर भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला शिपाई कुलविंदर कौर हिने थोबाडीत मारली. देहलीत शेतकर्‍यांच्या झालेल्या आंदोलनावर कंगणा रनौत यांनी टीका केली होती.

या टिकेमुळेच त्यांना मारहाण केल्याचे या महिला शिपायाने सांगितल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या घटनेनंतर कुलविंदर कौर हिला निलंबित करण्यात आले असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.