अतिक अहमद याची दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

गुंडगिरीद्वारे इतकी संपत्ती गोळा होईपर्यंत त्याला पाठीशी घालणारे भ्रष्ट पोलीस, प्रशासन, मंत्री आणि राजकीय पक्ष यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान !

वर्ष १९४३ मध्ये ‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ची स्थापना करण्यात आली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक चालू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला.

‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधामात्र येथे उर्दू भवन नको.

अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांची हत्या

पत्रकाराच्या रूपात तेथे आलेल्या ३ जणांनी पाठीमागून येऊन कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा गुंड भाऊ अश्रफ अहमद यांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. तिघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

मुंबईत ३ आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती देणार्‍या धर्मांधाला नगर येथून अटक !

प्रथम खोटी माहिती देऊन एक दिवस खरोखरच आतंकवाद्यांना घुसण्यासाठी साहाय्य करायलाही हे धर्मांध मागे-पुढे पहाणार नाहीत. त्यामुळे अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

विवेक सभेत डॉ. उदय निरगुडकर यांचे कालातीत स्वातंत्र्यवीर सावरकर यावर व्याख्यान !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपतींना मासिक श्रद्धांजली वहाण्यासाठी विवेक सभा आयोजित केली जाते. या विवेक सभेत रविवार, १६ एप्रिलला ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे कालातीत स्वातंत्र्यवीर सावरकर यावर सायंकाळी ६.३० सिटी हायस्कूल येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

रुग्णालयातील आगीच्या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना मानवाधिकार आयोगाची कारणे दाखवा नोटीस !

वसई-विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये वातानुकूलित यंत्रामुळे अतीदक्षता विभागात २३ एप्रिल २०२१ या दिवशी लागलेल्या आगीमध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

भूमीच्या वादातून थोरल्या भावाकडून सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील किन्हईजवळ गणेशवाडी येथे थोरल्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज फर्मागुडी येथे सभा

या सभेला २५ सहस्र लोकांची उपस्थिती अपेक्षित असून याद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या सिद्धतेचे बिगुल वाजणार आहे.

आर्.बी.एल्. बँकेद्वारे कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप !

आर्.बी.एल्. बँकेने त्यांच्या सी.एस्.आर्. उपक्रम – उमीद १०००च्या अंतर्गत कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप केले. हे वाटप जिल्हा परिषद येथे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.