आंदोलन पुन्हा जोर धरणार या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ११ जणांना केली अटक

प्रकल्प विरोधकांचा विरोध अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अशातच ६ मे या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटणार आहेत.

लोटे (खेड) येथील अरोमा इंटरमिडिएट्समध्ये भीषण आग

रिॲक्टरमधील रसायनाने अचानक पेट घेतल्याने आस्थापनाच्या काही भागास भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कुणी घायाळ झालेले नसले, तरी आस्थापनाची आर्थिक हानी झाली आहे.

चिपळूण येथे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये उन्हाळा न्यून होईपर्यंत केली थंडगार पाण्याची व्यवस्था

हा  उपक्रम हा पर्यावरणपूरक असून कागदी ग्लासमधून या पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थीही स्वतःच्या बाटलीमधूनही हे पाणी भरून घेऊ शकतील, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेटीचा लिलाव बंद केल्यापासून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेट्यांच्या लिलावाची पद्धत बंद झाल्यापासून मागील १३ वर्षांत मंदिरातील रोख रक्कम आणि सोने-चांदी यांच्या स्वरूपातील उत्पन्न १० पटींनी वाढले आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्‍या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

शरद पवार यांचे त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने एकमताने फेटाळले !

शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचे दिलेले त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने फेटाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ५ मे या दिवशी या समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

पाकला माहिती पुरवल्याच्या प्रकरणी पुण्यातील डी.आर्.डी.ओ.च्या संचालकांना ए.टी.एस्.कडून अटक !

मातृभूमीशी प्रतारणा करणार्‍या अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. डी.आर्.डी.ओ.सारख्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्थेमध्ये असे प्रकार घडत असतील, तर हे गंभीर आहे !

अकोट फैल दंगलप्रकरणी ७० दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंद !

जिल्ह्यातील अकोट फैल येथे २ मेच्या रात्री पूर्ववैमनस्यातून २ गटांत दंगल उसळली होती. त्या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांची हानी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड चालू केली होती.

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

मद्रास उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली !