थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. ५ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. याच दिवशी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिलेला आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले की, केरळमधील धर्मनिरपेक्ष समाज या चित्रपटाचा स्वीकार करील. तुम्ही चित्रपट न पहाता याच्यावर बंदी घालण्याची मागणी कशी करू शकता ?, असा प्रश्न न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. ‘या चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपटाचे विज्ञापन) पाहून यात काही चुकीचे आहे, असे दिसून आलेले नाही’, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
The Kerala Story: केरल हाईकोर्ट ने फिल्म ‘द केरला स्टोरी’ के रिलीज पर रोक लगाने से किया इनकार, जानें क्या कहा #thekeralastory #entertainment #kerla #film #मनोरंजन #केरल https://t.co/oZiVzdnh2P
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) May 5, 2023
मद्रास उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली !
‘द केरल स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयातही प्रविष्ट करण्यात आली होती. ‘चित्रपट प्रदर्शित झाला, तर देशातील धार्मिक सलोखा आणि सार्वजनिक शांतता बिघडणार आहे’, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.
मद्रास हाईकोर्ट ने ‘द केरल स्टोरी’ मूवी पर बैन की मांग वाली जनहित याचिका खारिज की, कहा- यह नहीं मान सकते कि इससे समस्याएं पैदा होंगी #TheKeralaStory #MadrasHighCourt https://t.co/SjGQUom5fP
— Live Law Hindi (@LivelawH) May 4, 2023
न्यायालयाने सुनावणीच्या वेळी म्हटले की, तुम्ही शेवटच्या क्षणी का येत आहात ? आधी आला असता, तर कुणाला तरी चित्रपट बघून ठरवायला सांगता आले असते. तुम्ही चित्रपट न पहाता आला आहात.
हिंदु संन्याशांना बलात्कारी म्हणून दाखवणारे असंख्य चित्रपट असूनही कुणी निषेध करत नाही ! – न्यायालयाची टिप्पणीन्यायालयाने या वेळी म्हटले की, १. या चित्रपटात इस्लामच्या विरोधात काय आहे ? धर्माच्या विरोधात कोणताही आरोप नाही. आरोप इस्लामिक स्टेटच्या विरोधात आहे. २. असे असंख्य चित्रपट आहेत ज्यात हिंदु संन्याशांना तस्कर किंवा बलात्कारी म्हणून चित्रित केले गेले आहे; परंतु त्याचे कोणतेही प्रतिकूल परिणाम झाले नाहीत. कुणीही निषेध करत नाही. असे अनेक हिंदी आणि मल्लाळम् चित्रपट आहेत. ३. आम्हाला सत्यात जाण्याची आवश्यकता नाही. केवळ काही धार्मिक प्रमुखाला वाईटरित्या दाखवल्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याचे कारण नाही. ४. मार्गदर्शक तत्त्वांनुसार केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाचा विचार केला आहे आणि त्याचे परीक्षण केले आहे. निर्मात्यांनी चित्रपट प्रारंभ होण्यापूर्वी त्यात स्पष्ट केले आहे, ‘हा चित्रपट काल्पनिक आणि नाट्यमय आहे.’ आम्ही चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी अंतरिम आदेश पारित करण्यास इच्छुक नाही. |