सिंधुदुर्ग : आचरा येथे गोळीबार आणि प्राणघातक आक्रमण करणार्‍या दोघांना पोलीस कोठडी

या आक्रमणात चारचाकीतील गौरव पेडणेकर घायाळ झाला. तसेच चारचाकीतील अन्य युवकांवर गोळीबार करण्यात आला; मात्र ते सुदैवाने वाचले. यातील जुवाटकर हा घटनास्थळावरून पसार झाला, तसेच तौकिर आणि प्रतीक हडकर हे पळून जात असतांना ग्रामस्थांनी त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.

सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना सेवेत घेण्याच्या निर्णयामुळे डी.एड्. बेरोजगार संतप्त

डी.एड्. पदविकेत मिळवलेली गुणवत्ता असतांना पुन:पुन्हा गुणवत्ता का तपासली जात आहे ? केवळ  परीक्षांचा मांडलेला खेळ, १० वर्षांत परीक्षांसाठी शुल्क आकारून  भरलेली तिजोरी, प्रमाणपत्रांचा उघड झालेला भ्रष्टाचार यामुळे आता कुणाचाच परीक्षांवर विश्‍वास राहिलेला नाही.

हणजूण येथील ‘हाऊस ऑफ चापोरा’ या उपाहारगृहावर गोवा पोलिसांची धाड

या धाडीमध्ये मिळालेले पदार्थ रासायनिक विश्‍लेषण करण्यासाठी पाठवण्यात आले असून याविषयीच्या अहवालात त्या पदार्थांमध्ये अमली पदार्थ असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

गोव्यात १२ वीचा निकाल ९५.४६ टक्के

बारावीच्या परीक्षेचा सविस्तर निकाल https://results.gbshse.net/#/  आणि https://www.gbshse.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट गोवा शासनाने करमुक्त करावा ! – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती

मध्यप्रदेश शासनाने हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे गोवा शासनाने गोव्यातही हा चित्रपट करमुक्त करावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादची भीषणता प्रत्येक हिंदु युवतीपर्यंत पोचण्यासाठी शासनाने हातभार लावावा.

यंत्र खरेदी प्रकरणी सेवानिवृत्त वैद्यकीय संचालकांवर कारवाई !

महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी हे यंत्र खरेदीचा आदेश दिला. त्यामुळे त्यांच्यावर ८ वर्षांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कराड येथील गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी कार्यरत असणार्‍या नगरपरिषदेच्या विरोधात ‘गोरक्षण बचाव समिती’चे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण !

गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी गोप्रेमींच्या महाराष्ट्रात करण्यात येणारी दडपशाही संतापजनक !

धर्मांध अल्पवयीन युवकाने टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले !

हुपरी येथे ५ मे या दिवशी एका धर्मांध अल्पवयीन युवकाने जाणीवपूर्वक टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले. ही गोष्ट संबंधित हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर तात्काळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

पुणे येथील डी.आर्.डी.ओ.च्या शास्त्रज्ञाकडून ‘लॅपटॉप’सह ३ भ्रमणभाष जप्त !

वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याकडून ‘लॅपटॉप’सह (भ्रमणसंगणक) ३ भ्रमणभाष आणि संगणकाची ‘हार्डडिस्क’ जप्त केली आहे. त्यातून त्यांनी देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे डी.आर्.डी.ओ.च्या अहवालातून समोर आले आहे.

कल्याण येथे गोतस्करी करणार्‍या धर्मांधांच्या कह्यातून २ गायींची सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याचेही भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करण्याचे सर्रास धाडस करतात ! असे प्रकार थांबण्यासाठी कायद्यानुसार धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !