२ सैनिकांचे केले होते अपहरण
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असलेल्या शांगस आणि कोकरनाग येथील जंगलात गस्त घालत असलेल्या प्रादेशिक सैन्याच्या २ सैनिकांचे ८ ऑक्टोबरला अपहरण केले होते. यांतील एक सैनिक घायाळ अवस्थेत आतंकवाद्यांच्या तावडीतून निसटला, तरी दुसर्या सैनिकाला ओलीस ठेवल्याची माहिती होती.
J & K Kidnapped Jawan Found Dead: Jammu and Kashmir: Body of the soldier kidnapped by terrorists found!
Two soldiers were abducted.
It may not be surprising that with the formation of a government led by the terrorist-supporting National Conference and Congress in Jammu and… pic.twitter.com/iAXdXY8KGz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 9, 2024
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी सैनिकांचे अपहरण करण्यात आले होते. बेपत्ता सैनिकाच्या शोधासाठी ९ ऑक्टोबरच्या सकाळी परिसरात शोधमोहीम हाती घेतली गेली. या वेळी कोकरनाग भागातील उत्रुसू जंगलातून या सैनिकाचा मृतदेह सापडला. मुकेधमपोरा नोगाम येथील रहिवासी असलेल्या या सैनिकाचे नाव हिलाल अहमद भट असल्याची माहिती सैन्याने दिली.
‘चिनार कॉर्प्स’ने एका पोस्टमध्ये म्हटले होते की, गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय सैनिक आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी ८ ऑक्टोबरला काजवान जंगल परिसरात संयुक्त आतंकवादविरोधी कारवाई चालू केली. या वेळी जंगलात गस्त घालत असतांना हिलाल अहमद भट यांचे अपहरण करण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|