हुपरी परिसरात तणाव
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – हुपरी येथे ५ मे या दिवशी एका धर्मांध अल्पवयीन युवकाने जाणीवपूर्वक टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले. ही गोष्ट संबंधित हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर तात्काळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. या प्रकरणामुळे हुपरी आणि परिसरात ५ मेपासून तणाव आहे. या संदर्भात सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया देत ६ मे या दिवशी हुपरी शहर बंद ठेवले होते. या प्रकरणी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (महापुरुषांच्या विटंबनेचे वाढते प्रकार पहाता धर्मांधांना कायद्याचा धाक नाही, हेच स्पष्ट होते. महापुरुषांची विटंबना करणार्यांना अशा प्रकारे शिक्षा होणे अपेक्षित आहे की, परत असे प्रकार घडता कामा नयेत ! – संपादक)
१. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या छायाचित्रांची विटंबना करण्याचे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात वाढले असून दोन प्रकरणांत धर्मांध युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
२. काही दिवसांपासून हेर्ले येथे महापुरुषांच्या फलकाची विटंबना केल्याचा प्रकार झाल्यावर जिल्ह्यात याच्या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून निषेध म्हणून कोणते ना कोणते गाव बंद ठेवण्यात येत आहे.