Muhammad Yunus : बांगलादेशातील राजकीय पालटांमुळे भारत खूश नाही !

बांगलादेशातील अंतरिक सरकारचे मुख्‍य सल्लागार महंमद युनूस यांचे मत

बांगलादेशातील अंतरिक सरकारचे मुख्‍य सल्लागार महंमद युनूस

ढाका –  बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे मुख्‍य सल्लागार महंमद युनूस यांनी म्‍हटले आहे की, देशात अलीकडेच सत्तापरिवर्तन झाले असले, तरी ढाका-देहली संबंध अतिशय दृढ राहिले पाहिजेत आणि ते दोन्‍ही देशांच्‍या हिताचे आहे. तत्‍कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑगस्‍ट २०२४ मध्‍ये त्‍यागपत्र दिल्‍यानंतर अर्थतज्ञ महंमद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्‍य सल्लागार बनले होते. विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनामुळे शेख हसीना यांनी ५ ऑगस्‍टला देशातून पलायन केले होते. भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंधांमधील अलीकडील तणावाविषयी विचारले असता, युनूस म्‍हणाले की, बांगलादेशातील अलीकडील घटनांमुळे भारत ‘निराश’ झाला आहे आणि तो बांगलादेशातील पालटांमुळे खूश नाही.

युनूस म्‍हणाले की, या पालटांनंतरही भारताने बांगलादेशाशी चांगले संबंध निर्माण केले पाहिजेत; कारण ते त्‍याच्‍या स्‍वतःच्‍या हितासाठीही आवश्‍यक आहे. (चिमुकला बांगलादेश भारताला त्‍याच्‍या हिताच्‍या गोष्‍टी सांगण्‍याचे धाडस करतो. भारत त्‍याचे हित कशात आहे, ते बघेल; बांगलादेशाने ते सांगण्‍याची आवश्‍यकता नाही, हे भारताने त्‍याला खडसावून सांगायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंवर अत्‍याचार होत असतांना भारत कसा खूश असेल ? भारताला खूश करण्‍यासाठी बांगलादेश तेथील हिंदूंवरील अत्‍याचार थांबवणार का, हे युनूस यांनी प्रथम जाहीर करावे !