नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र सर्वाेच्च न्यायालयाने वैध ठरवले !

मुंबई – विद्यमान खासदार आणि येत्या लोकसभा निवडणुकीच्या अमरावती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र सर्वाेच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. ४ एप्रिल या दिवशी न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.

मुंबई उच्च न्यायालयाने वर्ष २०२१ मध्ये नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वाेच्च न्यायालयात याविषयीची सुनावणी २८ फेब्रुवारी या दिवशी पूर्ण झाली होती. हा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने  रहित केला आहे.