गुन्हे शाखेच्या ‘खंडणीविरोधी पथक २’ची कारवाई !
पुणे – धायरी भागातील एका मॉलमध्ये सशस्त्र दरोड्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या मुलांकडून ५ गावठी पिस्तुलांसह ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या ‘खंडणीविरोधी पथक २’ने केली आहे. धायरी गावातील डी.एस्.के. रस्त्यावर एक मॉल आहे.
या मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या सिद्धतेत असलेले काही जण वाहनतळाजवळ थांबले होते. २ एप्रिलच्या रात्री पहार्यावर असलेल्या खंडणीविरोधी पथकाने त्यांना हटकले. त्या वेळी ते पळून जाऊ लागले. शंका आल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.
संपादकीय भूमिकासध्या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पहाता समाजाची वाटचाल विनाशाकडे तर होत नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासून शाळेमध्ये नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे ! |