जात वैधता प्रमाणपत्र रहित करण्याचा निर्णय स्थगित करण्याची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली !
नागपूर – येथील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या सौ. रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रहित ठरवले होते. यामुळे त्यांचे रामटेक लोकसभा निवडणुकीतील आवेदन रहित करण्यात आले. याविरुद्ध बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. ४ एप्रिल या दिवशी झालेल्या सुनावणीत नामनिर्देशन पत्र रहित करण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती उच्च न्यायालयाला त्यांनी केली होती, ती उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आवेदन रहित झाल्याने सौ. रश्मी बर्वे यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.
बर्वे प्रकरणात राज्य सरकारने नव्याने त्यांच्या चौकशीचे आदेश लागू केले आहेत, तसेच गेल्या आठवड्यात जिल्हा जातपडताळणी समितीनेही बर्वे यांना नोटीस बजावली होती.