४ दुकानांवरील धाडीत २९२ किलो गोमांस जप्त !

राजरोसपणे होणारी गोहत्या थांबवण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्यक !

पुणे येथील २ गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे नोंद !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी २ मंडळांवर सहकार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील ‘अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळ’ आणि ‘शिवतीर्थ मंडळ’ या २ मंडळांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पूररेषेच्या आतील अनधिकृत बांधकामांना नोटीसा !

अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासनातील अधिकारी झोपा काढत होते का ?  या बांधकामांना उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे.

पुणे येथील श्री चतु:श्रृंगी मंदिर २९ सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुले !

येथील श्री चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी नवरात्र उत्सवाची घटस्थापना होत आहे. त्यापूर्वी २९ सप्टेंबरपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी दिली आहे.

लोहगाव (पुणे) येथे ‘गायत्री परिवारा’च्या वतीने महिलांसाठी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या कार्यक्रमाचे आयोजन !

मुलींना धर्मशिक्षण मिळाले नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या कचाट्यात सापडतात. महिलांनी स्वतःच्या रक्षणासाठी व्यायामाचे प्रकार करून सिद्ध व्हायचे आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत २४ महत्त्वाचे निर्णय !

२३ सप्टेंबर या दिवशी झालेल्या राज्यशासनाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत २४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

सोलापूर रस्ता ते पुणे-बेंगळूरू रस्त्याच्या रिंगरोडसाठी ८ आस्थापनांकडून निविदा !

सोलापूर रस्ता ते पुणे-बेंगळूरूच्या दरम्यानच्या ३१ कि.मी. लांबीच्या प्रस्तावित रिंगरोडच्या कामासाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने) मागवलेल्या निविदांची मुदत संपुष्टात आली आहे.

मुंबईत ५ वर्षांत विविध प्रकारच्या रस्त्यांचे प्रकल्प उभारणार !

येत्या पाच वर्षांमध्ये मुंबईत रस्त्यांची तब्बल ५८ सहस्र कोटींची कामे केली जाणार आहेत. एम्.एम्.आर्.डी.ए. (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)ने या प्रकल्पाला संमती दिली आहे.

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने गंभीर आजारांचे वेळेपूर्वी निदान !

मुंबई विद्यापिठाने प्रामुख्याने महिलांमधील आणि अन्य गंभीर आजार  यांचे आगाऊ निदान करण्यासाठी काही रुग्णालयांच्या साहाय्याने कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेलचा विकास करण्याची योजना हाती घेतली आहे.

२९ सप्टेंबर या दिवशी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’चा तिसरा हप्ता !

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसर्‍या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. याविषयीची अधिकृत माहिती महिला आणि बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.