एर्नाकुलम् (केरळ) येथे प्रवासी कामगारांचे पोलिसांवर आक्रमण

पोलिसांवर आक्रमणे होत असतील आणि त्यात ते मार खात असतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ? आतंकवाद्यांपासून पोलीस स्वतःचे आणि जनतेचे रक्षण कसे करणार ?

निधन वार्ता

सनातनच्या साधिका आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांचे २६ डिसेंबर या दिवशी दीर्घकाळ आजारामुळे निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या.

केरळमधील मंत्र्याच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या बांधकामावर ४ लाख रुपये व्यय करण्यास साम्यवादी सरकारची संमती !

जनतेच्या पैशांची लूट करणारे साम्यवादी सरकार ! असा पक्ष सत्तेवर असल्यास जनहित काय साधले जाणार ?

केरळमधील माकपच्या सरकारमधील हज मंत्री सरकारी पैशांतून अमेरिकेत घेणार उपचार !

स्वतःच्या वैद्यकीय उपचारांसाठी जनतेच्या करातून पैसे खर्च करणार्‍या मंत्र्यांना निवडून देणार्‍या केरळमधील जनतेला ही शिक्षाच होत !

केरळमध्ये भाजप नेते रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी एस्.डी.पी.आय.च्या ५ कार्यकर्त्यांना अटक

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.च्या) ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राला विरोध करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली

भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असते. या छायाचित्राविषयी आक्षेप घेणारी एक याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळत याचिकाकर्त्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

केरळमध्ये धर्मांध सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या दोघांना अटक !

शान यांच्या हत्येचा सूड म्हणून भाजपचे ओबीसी मोर्चाचे रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही !

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्‍चर्य ते काय ?

अलप्पुळा (केरळ) येथे १२ घंट्यांत भाजप आणि एस्.डी.पी.आय. यांच्या नेत्यांची हत्या

अलप्पुळा १८ डिसेंबरच्या रात्री जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (‘एस्.डी.पी.आय.’चे) राज्य सचिव के.एस्. शान या नेत्याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली.

केरळमध्ये ‘ईडी’कडून पी.एफ्.आय.च्या ४ ठिकाणांवर धाडी

या धाडीतून आक्षेपार्ह कागदपत्रे, यंत्रे आणि विदेशांत असलेल्या संपत्तीविषयीची माहिती मिळाली आहे. देशात पी.एफ्.आय.विरुद्ध दंगली भडकावणे, आतंकवाद्यांशी संबंध आदी गुन्हे नोंद आहेत.