दक्षिण भारतातील अभिनेते विजय बाबू यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणी अटक

अभिनेते विजय बाबू

एर्नाकुलम् (केरळ) – एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी दक्षिण भारतातील अभिनेते विजय बाबू यांना कोच्चि येथून अटक करण्यात आली आहे. एप्रिल २०२२ मध्ये या महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

विजय बाबू यांच्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर ते दुबई येथे पळून गेले होते. जूनमध्ये ते भारतात परतले होते.