केरळमधील मोपला मुसलमानांनी केलेल्या हिंदूंच्या नरसंहारावरील चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास केरळ सरकारचा नकार

थिरूवनंतपूरम् (केरळ) – हिंदु धर्मात प्रवेश केलेले चित्रपट दिग्दर्शक राम सिम्हन (पूर्वीश्रमीचे अली अकबर) यांच्या ‘पुझा मुट्टुअल पुझा वरी’ (नदीपासून नदीपर्यंत) या मल्याळम् चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास  केरळ सरकारने नकार दिला. (सत्य इतिहास दडपणारे हिंदुद्वेष्टे केरळ सरकार ! संपादक) हा चित्रपट केरळमधील मोपला मुसलमानांनी वर्ष १९२१ मध्ये हिंदूंच्या केलेल्या नरसंहाराविषयी आहे. इतिहासकारांनी मात्र या नरसंहाराला ‘जमीनदारांच्या विरोधातील बंड’ असे म्हणत मुसलमानांची बाजू घेतली आहे.

संपादकीय भूमिका

  • केरळचे कम्युनिस्ट आघाडी सरकार कट्टरतावादी मुसलमानांचे पालनकर्ते असल्याने ते अशा मुसलमानांचे खरे स्वरूप उघड करणार्‍या चित्रपटाला प्रमाणपत्र देतीलच कसे ?
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांचे समर्थन करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठल्या बिळात बसले आहेत ?