केरळ पोलिसांच्या वाहनांवर इस्लामी चिन्हे असलेले ‘स्टिकर्स’ !

केरळ पोलिसांच्या वाहनांवर इस्लामी चिन्हे असलेले ‘स्टिकर्स’ (सौजन्य : NEWS 18)

कोच्चि (केरळ) – शबरीमला मंदिरात जाणार्‍या हिंदु भाविकांच्या सुरक्षेसाठी तेथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांच्या वाहनांवर ‘चांद-तारे’ हे इस्लामी चिन्ह असणारे ‘स्टिकर्स’ चिकटवल्याचे हिंदु भाविकांच्या निदर्शनास आले. काही भाविकांनी याची छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली आहेत. त्याची नोंद घेऊन हे ‘स्टिकर्स’ काढण्याचा आदेश केरळचे पोलीस महासंचालक अनिल कांत यांनी दिला आहे. ‘असे स्टिकर्स लावणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल’, असेही कांत यांनी स्पष्ट केले आहे.

नियमांनुसार पोलिसांच्या वाहनांवर धार्मिक किंवा राजकीय लिखाण करणे किंवा चिन्हे लावणे निषिद्ध आहे. असे असतांनाही पोलिसांच्या वाहनांवर चांद-तारे असणारे स्टिकर्स लावण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

साम्यवादी केरळच्या राज्यात पोलीस दलाचे इस्लामीकरण झाल्यास आश्‍चर्य ते काय ?