केरळच्या माकप आघाडी सरकारचे मंत्री साजी चेरियन यांचा दावा !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – मानवतेच्या प्रारंभापासूनच शोषण चालू आहे. हे स्वाभाविक आहे की, सरकारी प्रशासन या प्रक्रियेचे समर्थन करणारे आहे. हे सर्वच सांगतात की, आमच्याकडे चांगल्या पद्धतीने लिहिलेली राज्यघटना आहे; मात्र मी सांगेन की, देशाची राज्यघटना अशा प्रकारे लिहिण्यात आली आहे की, अधिकाधिक लोकांना लुटता यावे, असे विधान केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडी सरकारमधील ‘संस्कृती आणि मत्स्यपालन’ मंत्री साजी चेरियन यांनी मल्लापल्ली येथील एका सभेत केले. या विधानावरून काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांकडून, तसेच संघटनांकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. त्यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.
Saji Cherian, Kerala Minister has made the most insulting statements about #IndianConstitution. Obnoxious words. He should resign or CM should demand minister ‘s resignation.#Constitution
— V D Satheesan (@vdsatheesan) July 5, 2022
संपादकीय भूमिकाएरव्ही राज्यघटनेत सुधारणा करण्याची हिंदूंनी मागणी केल्यावर त्याला विरोध करणारे साम्यवादी आता स्वतःच राज्यघटनेचा अवमान करत आहेत, हे लक्षात घ्या ! |