केरळमधील माकपच्या मुख्यालयावर बाँबफेक ! : जीवितहानी नाही  

सीपीआय (एम) मुख्यालयावर बॉम्ब हल्ला

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकपच्या) मुख्यालयावर गावठी बाँब फेकण्यात आल्याची घटना ३० जूनच्या रात्री घडली. बाँब फेकणारी व्यक्ती दुचाकीवरून तेथे आली आणि तिने बाँब फेकून पळ काढला. या बाँबच्या स्फोटात कोणतीही जीवितहोनी झाली नाही. बाँब फेकण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे.

१. माकपचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन् यांनी म्हटले की, कुणीतरी आमच्या आघाडी सरकारला भडकावण्याचा प्रयत्न करत आहे.

२. केरळचे अर्थमंत्री के.एन्. बालगोपाल यांनी या घटनेविषयी सांगितले की, हा केरळमध्ये अशांतता पसरवण्याचा सुनियोजित प्रयत्न आहे. आम्ही केरळच्या जनतेला शांतता राखण्याची विनंती करतो.

संपादकीय भूमिका

स्वतःच्याही मुख्यालयाचे संरक्षण करू न शकणारा केरळमधील सत्ताधारी माकप सत्तेवर रहाण्याच्या लायकीचा आहे का ?