एकटी मुसलमान महिला अल्पवयीन मुलांची पालक होऊ शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देतांना एकटी मुसलमान महिला तिचे अल्पवयीन मूल आणि तिची संपत्ती यांची पालक होऊ शकत नाही; कारण यापूर्वीच अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले आहेत.

कुराण आणि हदीस (एका विशिष्ट परिस्थितीमध्ये महंमद पैगंबर कसे वागले, कसे बोलले यांचा संग्रह) यांमध्ये मुसलमान महिलांना मुलांचे पालक होण्याच्या अधिकारावर कोणतेही बंधन नाही; मात्र न्यायालयाने म्हटले की, राज्यघटनेच्या कलम १४१ नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करण्यास आम्ही बाध्य आहोेत.