केरळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात इस्लामी गटाकडून ‘तालिबानी’ पद्धतीनुसार बैठकीचे आयोजन

  • मुले आणि मुली यांच्यामध्ये टाकला पडदा

  • सामाजिक माध्यमांद्वारे टीका

थ्रिशूर (केरळ) – अफगाणिस्तानातील तालिबानप्रमाणे येथील ‘विस्डम’ या संघटनेचे इस्लामी संघटनेचे धर्मोपदेशक अब्दुल्ला बसिल यांनी एका इस्लामी गटाने येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ‘तालिबानी पद्धती’नुसार मुले आणि मुली यांच्यामध्ये पडदा टाकला होता. या प्रकारावरून समाजिक माध्यमांद्वारे टीका करण्यात आली.  याविषयी बोलतांना अब्दुल्ला बसिल म्हणाले लिंगविषयी धर्माचा दृष्टीकोन जे पचवू शकत नाही, त्या उदारमतवाद्यांची मला दया येते.
गेल्या वर्षी सप्टेंबर मासात तालिबानशासित अफगाणिस्तान येथे एका शाळेतील वर्गात मुले आणि मुली यांना अशाच प्रकारे पडदा टाकून वेगळे बसवले गेल्याचे वृत्त जगभर प्रसारित झाले होते. तेव्हाही लिंगभेदी तालिबान सरकारवर सामाजिक माध्यमांद्वारे टीका झाली होती.

संपादकीय भूमिका

स्त्री-पुरुष समानतेसाठी लढणारे आता गप्प का ?