गोवा शासन ‘गोवा मेन’ या नावाने मटका व्यवसाय चालवत असल्याचा माजी आमदार किरण कांदोळकर यांचा आरोप

लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता एकजुटीने गोव्यातून मटका आणि सर्वच प्रकारचे जुगार हद्दपार करणे आवश्यक आहे !

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगामुळेच आपल्यापैकी लाखो लोकांना कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठी साहाय्य झाले. आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग हा अविभाज्य भाग बनवला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून केले

‘गोमेकॉ’तील ‘ऑक्सिजन’चा तुटवडा तपासण्यासाठी न्यायिक अन्वेषणाला गोवा शासनाचा नकार

असे असेल, तर प्रशासनाने सुव्यवस्थापन करून कोरोना रुग्णांच्या उपचारांतील अडचणी दूर कराव्या, असेच जनतेला वाटते !

आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

संतांच्या वंदनीय उपस्थितीत युवा साधकांचे ‘ऑनलाईन प्राथमिक शिबिर’ पार पडले !

कर्नाटकमधील व्यक्तींना गोव्यातील जलस्रोत खात्यात अधिकारी पदावर नेमण्यास पर्यावरणप्रेमीचा तीव्र आक्षेप !

गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये म्हादई जलवाटप तंटा चालू आहे. कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी अनधिकृतपणे मलप्रभा नदीत वळवल्याचा आरोप आहे. म्हादई जलवाटप तंट्याविषयी म्हादई लवादाने दिलेल्या निर्णयाला दोन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

गोव्यात संचारबंदीमध्ये २८ जूनपर्यंत वाढ

राज्यातील संचारबंदी आणखी एक आठवडा; म्हणजेच २८ जून या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून ही घोषणा केली. राज्यात ९ मेपासून संचारबंदी लागू आहे आणि तिच्या कालावधीत आता तिसर्‍यांदा वाढ करण्यात आली आहे.

गोव्यात शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिघात ‘कोटपा’ कायद्याचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी ८८५ दुकाने

‘इंटरनॅशनल फादर्स डे’च्या निमित्ताने ‘नोट’ आणि ‘कंझ्यूमर वॉइस्’ या संघटनांनी गोव्यात तंबाखू नियंत्रण कायद्याचे कठोरतेने पालन करण्याची मागणी गोवा सरकारकडे केली आहे.

मगोपने क्रांतीदिनी मडगाव येथील लोहिया मैदानात राजकारणात क्रांती घडवण्याचा केला निर्धार

आगामी विधानसभा निवडणुकीत मगोप २२ जागा लढवणार आहे

विर्नोडा, पेडणे येथील मंदिरातील चोरीच्या प्रकरणी आरोपी एक आठवड्यात पोलिसांच्या कह्यात

हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षितच !

कोरोना महामारीच्या विरोधात जागतिक लढ्यात योगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ! – श्रीपाद नाईक, संरक्षण राज्यमंत्री

‘जेथे आपण, तेथे योग’ या संकल्पनेवर यंदा योग दिवस साजरा करणार