विर्नोडा, पेडणे येथील मंदिरातील चोरीच्या प्रकरणी आरोपी एक आठवड्यात पोलिसांच्या कह्यात

हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षितच !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पेडणे, १९ जून (वार्ता.) – विनोर्डा, पेडणे येथील श्री रवळनाथ पंचायत मंदिरातील चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी एक आठवड्यात संशयित आरोपी मिथुन विष्णु पवार (वय २५ वर्षे, रहाणारा भाटपाणी, महाराष्ट्र) याला मुद्देमालासह कह्यात घेतले.

१३ जून या दिवशी श्री रवळनाथ पंचायत मंदिरातील दानपेटीतून ३ सहस्र रुपये चोरण्यात आले होते. ‘सीसीटीव्ही’ फूटेज आणि ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती यांच्या आधारे पोलिसांनी संशयिताला न्हयबाग येथून कह्यात घेतले.