
१. एका संतांनी साधिकेला एका कागदावर आवडीच्या भाज्या आणि मैत्रिणींची नावे लिहायला सांगून कागद न पहाता त्याच्यावरील नावे त्याच क्रमाने साधकांना सांगणे
वर्ष २००४ मध्ये एक संत देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्यांनी मला एका कागदावर माझ्या आवडीच्या भाज्या आणि माझ्या मैत्रिणींची नावे लिहिण्यास सांगितली. त्या संतांनी तो कागद माझ्याकडेच ठेवण्यास सांगितला. थोड्या वेळाने त्या संतांनी मला आणि माझ्या समवेत सेवा करणार्या साधकाला बोलावले अन् कागदावर काय लिहिले आहे, ते त्यातील क्रमानुसार तसेच सांगितले. विशेष म्हणजे तो कागद घडी करून मी माझ्याकडेच ठेवला होता.
२. संतांनी पेल्यातील पाण्यात स्वतःची उजव्या हाताची तर्जनी फिरवून पुष्कराज खडा विरघळवणे आणि ते पाणी साधकांना चैतन्य मिळण्यासाठी प्यायला देणे
वर्ष २००४ मध्ये काही मासांनी तेच संत पुन्हा देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्यांनी मला आणि माझ्या समवेत सेवा करणार्या सहसाधकाला त्यांच्या खोलीत बोलावले. त्या वेळी त्या संतांच्या खोलीत आम्ही दोघेच होतो. त्या संतांनी एका पेल्यात पाणी घेतले. आमच्या समोर त्यांनी त्या पाण्यात ‘पुष्कराज’ नावाचा पिवळ्या रंगाचा खडा टाकला. त्यानंतर त्यांनी त्यांची उजव्या हाताची तर्जनी त्या पेल्यातील पाण्यात बुडवली आणि ती फिरवू लागले. ५ ते १० मिनिटांमध्ये तो पुष्कराज खडा पाण्यात पूर्ण विरघळला आणि पेल्यातले पाणी पिवळ्या रंगाचे झाले. त्यानंतर त्यांनी ते पाणी मला आणि सहसाधकाला चैतन्य मिळण्यासाठी म्हणून पिण्यास दिले.
३. संतांनी आश्रमात आल्यावर न पहाता किंवा कुणालाही न विचारता साधिका तिसर्या मजल्यावर असल्याचे सांगणे
वर्ष २००५ मध्ये ते संत पुन्हा देवद आश्रमात आले होते. त्या वेळी मी तिसर्या माळ्यावरील एका खोलीत सेवा करत असल्याने त्यांना भेटण्यासाठी खोलीत गेले नव्हते. तेव्हा त्या संतांनी मी तिसर्या मजल्यावरील एका खोलीत असल्याचे त्यांच्या सेवेसाठी असलेल्या साधिकेला सांगितले. त्या वेळी त्यांनी मला तेथे पाहिले नव्हते अथवा कुणाला विचारलेही नव्हते.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१.२०२४)