Bangladesh ‘Exaggerated’ : (म्हणे) ‘बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर आक्रमणे झालीच नाहीत !’ – मेजर जनरल महंमद अश्रफुझ्झमान सिद्दिकी

बांगलादेश सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांचा भारतात येऊन दावा !

डावीकडून भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजीतसिंह चौधरी आणि बांगलादेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक मेजर जनरल महंमद अश्रफुझ्झमान सिद्दिकी

नवी देहली –आंतरराष्ट्रीय सीमेपासून ८ किलोमीटर अंतरापर्यंत आमच्या सीमेत सुरक्षादलाने दुर्गा पूजा मंडळांना सुरक्षा पुरवली. अल्पसंख्यांकांवरील आक्रमणाची वृत्ते अतिशयोक्त होती आणि प्रत्यक्षात अशी आक्रमणे झालेलीच नाहीत. अशी माध्यमांमध्येच आली. अल्पसंख्यांकांवर आक्रमणे झाली नसल्याचे उदाहरण म्हणजे नुकताच सुरळीत पार पडलेला दुर्गा पूजा महोत्सव आहे, असा दावा बांगलादेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक मेजर जनरल महंमद अश्रफुझ्झमान सिद्दिकी यांनी केला आहे. भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजीतसिंह चौधरी यांच्यासह झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांमध्ये प्रत्येक २ वर्षांनी चर्चा होते. चर्चेची ही ५५वी फेरी आहे. उच्च स्तरावर झालेल्या चर्चेमध्ये इतरही अनेक सूत्रांवर चर्चा करण्यात आली. बांगलादेशामध्ये सत्तांतर झाल्यानंतरची उच्च स्तरावरील ही पहिली चर्चा होती.

भारताकडून बांगलादेश सीमेवर कुंपण उभारले जात असून त्यावर सिद्दिकी यांनी आक्षेप नोंदवला. सीमेपासून १५० यार्ड निमलष्करी भूमी असते. तेथे काम करण्यापूर्वी संयुक्त पहाणी व्हावी, अशी विनंती त्यांनी केली. भारत-बांगलादेश सीमा करार वर्ष १९७५ मध्ये झाला. त्यामध्ये कुठलाही पालट करण्यावर चर्चा झाली नसल्याचे सिद्दिकी यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

जे संपूर्ण जगाने पाहिले, ते उघडपणे नाकारणे, याला विनोदच म्हणावा लागेल ! अशा प्रकारचे ढळढळीत खोटे आणि तेही भारतात येऊन बोलण्याचे धाडस धर्मांध मुसलमानांमध्ये येतेच कसे ?