आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांना समितीच्या कार्याची माहिती सांगतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रयागराज – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची भेट घेऊन त्यांना गोवा येथे प्रतिवर्षी होणार्‍या राष्ट्रीय हिंदु अधिवेशनाचे निमंत्रण दिले. या प्रसंगी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्री गणेशानंद महाराज यांचा सन्मान केला.

श्री शंभू पंच अग्नि आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत सोमेश्वरानंद ब्रह्मचारी महाराज यांचीही घेतली भेट 

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्री शंभू पंच अग्नि आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत सोमेश्वरानंद ब्रह्मचारी महाराज यांचीही घेतली भेट घेऊन त्यांचा सन्मान केला, तसेच त्यांनाही राष्ट्रीय हिंदु अधिवेशनाचे निमंत्रण दिले. या वेळी श्रीमहंत सोमेश्वरानंद ब्रह्मचारी महाराज म्हणाले, ‘‘समितीचे कार्य फार चांगले असून सद्यःस्थितीत अशा कार्याची आवश्यकता आहे.’’