
आजारी माणसाने नुसते पडून रहावे; पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात; पण औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला, तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वत:लाच करायला पाहिजे. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे, हे नीट समजून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. स्वत: फसणे, हे जगाला फसवण्याइतकेच पाप आहे. ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे, त्याचा परमार्थही प्रपंचच म्हटला पाहिजे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज