Hindus Abducted In Bangladesh : बांगलादेशामध्ये धर्मांधांनी मंदिरातील एका पुजार्‍यासह ३ हिंदूंचे केले अपहरण : ४ जणांना अटक!

ढाका – बांगलादेशामध्ये हिंदूंना लक्ष्य करणे चालूच आहे. हिंदूंच्या विरोधात आक्रमणापासून ते अपहरणापर्यंतच्या घटना सतत घडत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार बांगलादेशातील चितगाव येथे इस्लामी कट्टरपंथीयांनी मंदिरातील एका पुजार्‍यासह तीन हिंदूंचे अपहरण केले आहे.

१. अपहरण झालेल्यांमध्ये पुजारी केशब मित्र दास (४३ वर्षे), रुबेल रुद्र (४२ वर्षे) आणि समीर दास (४५ वर्षे) यांचा समावेश आहे.

२. ४ धर्मांधांनी हे अपहरण केले आणि पीडितांच्या कुटुंबियांकडून ९ लाख रुपयांची खंडणी मागितली. अपहरणकर्त्यांमध्ये बशीर अहमद राणा, महंमद जिहाद, महंमद आरिफ आणि महंमद इमोन या आरोपींचा समावेश आहे.

३. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी चितगाव येथे इमारतीवर धाड टाकून चारही आरोपींना अटक केली आणि हिंदूंची सुटका केली.

४. हे चारही आरोपी ‘बी.एन्.पी.’शी संबंधित आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशात हिंदू असुरक्षित !