![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/28203002/karnatak.jpg)
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथे पीटर गोल्लापल्ली नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पीटर याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये याची माहिती दिली आहे. पीटर यांच्या कुटुंबियांनीदेखील ‘पत्नीच्या छळामुळे पीटर प्रचंड मानसिक तणावाखाली होते’, असा दावा केला आहे.
अवघ्या २ वर्षांपूर्वी विवाह झालेले पीटर गोल्लापल्ली हे त्यांची पत्नी फीभी उपाख्य पिंकी हिच्यासमवेत येथे रहात होते; पण गेल्या काही काळापासून त्यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. ३ महिन्यांपासून वादामुळे ते वेगळे रहात होते. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण अजूनही न्यायालयात चालू आहे. पिंकी यांनी घटस्फोटासाठी २० लाख रुपयांची हानीभरपाई मागितली होती. त्यामुळे पीटर मानसिक तणावात होते. पिंकी हिने एकदा पीटरच्या कार्यालयात जाऊन एका बैठकीच्या वेळी त्याच्याशी मोठा वाद घातल्याने पीटरच्या मालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते.