Ganga Sevadoot : ५०० हून अधिक गंगा सेवादुतांचा गंगा स्वच्छतेचा महासंकल्प !

गंगा सेवादुत

प्रयागराज – ७६ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त ‘नमामी गंगे पव्हेलियन’ येथे ध्वजारोहण आणि अन्य कार्यक्रम पार पडले. नोडल अधिकारी अर्थव राज यांनी ध्वजारोहण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या नंतर ५०० हून अधिक गंगा सेवादुतांचा गंगा स्वच्छतेचा महासंकल्प केला. पथनाट्याद्वारे गंगेला प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त करण्याचा संदेश देण्यात आला. महाकुंभक्षेत्रात प्लास्टिक वापर टाळणे, गंगा आणि यमुना यांच्या घाटावर स्वच्छता राखणे, यांविषयी जागृती करण्यात आली. या कार्यक्रमात गंगा स्वच्छतेसाठी कार्यरत असणार्‍या अनेक संघटनेंनी सहभाग घेतला.