प्रयागराज येथील महाकुंभात सनातनच्या ग्रंथांचा प्रचार आणि वितरण करण्यासाठी फिरत्या ‘ई-रिक्शा’चे उद्घाटन !

‘ई-रिक्शा’चे विधीवत् पूजन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (उत्तरप्रदेश), १५ जानेवारी (वार्ता.) – येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला संत, महंत, भाविक आणि जिज्ञासू यांचा उदंड प्रतिसाद मिळत असतांनाच आता फिरत्या ई-रिक्शाद्वारे सनातन-निर्मित उत्पादने आणि ग्रंथ यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर १३ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि पूजा करून फिरत्या ई-रिक्शाचा शुभारंभ करण्यात आला. अद्ययावत् अशा बॅटरीवर चालणारी ही ई-रिक्शा लक्ष्मणपुरी येथील धर्मप्रेमी श्री. भूपेंद्र प्रजापती यांनी उपलब्ध करून दिली आहे. ही ई-रिक्शा महाकुंभमेळ्यामध्ये प्रदर्शनासाठी वापरण्यात येत आहे.