|
राजकोट (गुजरात) – येथे वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे सांगत धर्मांध मुसलमानांनी हिंदु दुकानदारांची दुकाने बलपूर्वक बळकावल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर हिंदूंच्या दुकानांतील साहित्य रस्त्यावर फेकणार्या फारूख मुसानीसह ८ धर्मांध मुसलमानांना पोलिसांनी अटक केली आहे.
१. ३१ डिसेंबर २०२४ या दिवशी रात्री फारुख मुसानी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०-२५ मुसलमानांच्या जमावाने जुने दानपीठ परिसरातील दोन दुकानांचे कुलूप तोडून माल रस्त्यावर फेकून दिला.
२. या वेळी त्यांनी ‘ही दुकाने वक्फ बोर्डाची मालमत्ता असून ती रिकामी करावीत’, असा दावा केला होता. ही दुकाने अनेक दशकांपासून भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून ही जमीन वक्फ बोर्डाची नसून सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, असे हिंदु दुकानदारांनी स्पष्ट केले.
३. वक्फ बोर्डाच्या नावाखाली चालू असलेल्या या गुंडगिरीपासून संरक्षण आणि न्याय मिळावा, अशी मागणी हिंदु दुकानदारांनी केली आहे.
४. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती देतांना गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, सर्व दुकाने परत उघडण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
५. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून वक्फ बोर्डाच्या आदेशाची वैधताही तपासली जात आहे.
संपादकीय भूमिका
|