पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारी या दिवशी वीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी केली. देहलीतील नजफगड येथे हे महाविद्यालय उभारण्यात येत आहे. ते देहली विश्वविद्यालयाशी संलग्न असणार आहे. देहली विश्वविद्यालयाला ३० वर्षांनंतर नवीन महाविद्यालय मिळणार आहे. १४० कोटी रुपये खर्चून वीर सावरकर महाविद्यालय बांधण्यात येणार आहे. हे महाविद्यालय १८ सहस्र चौरस मीटरपेक्षा अधिक परिसरात पसरले आहे आणि येथे अत्याधुनिक सुविधा असतील. महाविद्यालयात २४ वर्गखोल्या आणि ८ ट्यूटोरियल खोल्या (अशा खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे छोटे गट करून एखाद्या विषयावर चर्चा केली जाते.) असतील. या महाविद्यालयात ग्रंथालय, उपाहारगृह आणि शिक्षकांसाठी ४० खोल्या असतील.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा महाविद्यालयांमध्ये राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे शिक्षणही मिळाले पाहिजे, अशीच हिंदूंनी अपेक्षा आहे ! |