१. जवाहरलाल नेहरू आणि एडविना यांच्यातील पत्रे गायब
‘प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड मेमोरियल (नेहरू म्युझियम मेमोरियल) तीन मूर्ती भवन, नवी देहली येथे असलेली जवाहरलाल नेहरू आणि लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना यांच्यातील पत्रे वर्ष २००८ मध्ये सोनिया गांधी यांनी त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून मागवून घेतली आणि गायब केली. तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे केंद्र सरकार होते. ही पत्रे मिळावी, प्रसिद्ध करावीत आणि ती ‘डिजिटलाइज्ड’ करून मिळावी, यासाठी इतिहासकार रिजवान कादरी यांनी १०.१२.२०२४ या दिवशी राहुल गांधी यांना एक पत्र पाठवले. त्यात त्यांनी सांगितले, ‘‘मी सोनिया गांधी यांना सदर पत्रे परत देण्याविषयी सप्टेंबर २०२४ मध्ये विनंती केली होती; मात्र त्यांनी ती पत्रे दिली नाहीत. त्यामुळे ती मिळण्यासाठी मी आपल्याला स्मरणपत्र पाठवत आहे.’’
२. जवाहरलाल नेहरू आणि एडविना यांच्यातील संबंधांविषयी एडविना यांच्या कन्या पामेलाचे मत
माऊंटबॅटन कुटुंबाची कन्या पामेला हिने ‘डॉटर ऑफ एम्पायर, लाईफ ॲज माऊंटबॅटन’ हे पुस्तक प्रकाशित केले. पामेला ही तिच्या मातापित्यांच्या समवेत भारतात आली होती. त्या वेळी तिने तिच्या आईचे जवाहरलाल नेहरूशी असलेले संबंध बघितले होते. त्याचा उल्लेख तिने ‘डॉटर ऑफ एम्पायर, लाईफ ॲज माऊंटबॅटन’ या तिच्या पुस्तकात केला. त्यात ती म्हणते, ‘माझ्या आईचे नेहरूंची अतिशय घनिष्ठ संबंध होते आणि त्यांचा एकमेकांविषयीचा आदर उल्लेखनीय होता. असे असले, तरी त्यांच्यात शारीरिक संबंध नसावेत; कारण त्यांना तसा एकांत मिळू शकत नव्हता. दोघेही ‘पब्लिक फिगर’ किंवा महनीय व्यक्ती असल्यामुळे त्यांना पोलीस, अन्वेषण यंत्रणा आणि प्रशासन यांची सुरक्षा असायची. (हे एखाद्या भारतीय मुलीला तिच्या आईविषयी सांगावे लागते का ?)’ एडविन माऊंटबॅटन यांची कन्या पामेला किंवा त्यांच्यावर पुस्तक लिहिणारा लेखक अँड्रयू यांचा संदर्भ देऊन असे सांगता येईल की, ते म्हणतात, ‘नेहरू वर्ष १९४६ मध्ये सिंगापूर येथे आले होते. तेव्हा ते एका मेजवानीमध्ये एडविन माऊंटबॅटन हिच्या समवेत नाचले.’ या प्रसंगाविषयी त्याने इंग्रजीत असे लिहिले, ‘नेहरू सॅट क्रॉस लेग्ड ॲट एडविन्स फिट ड्युरिंग डान्स रिसायटल.’
३. एडविनाच्या माध्यमातून ब्रिटिशांचा नेहरूंवर ‘हनी ट्रॅप’ (जाळे)?
मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी आत्मचरित्र लिहिले. त्यात त्यांनी नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांच्या संबंधांविषयी लिहिले होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद लिहितात, ‘भारताने स्वातंत्र्य मिळवले; मात्र भारतावर किंवा नेहरूवर एडविना माऊंटबॅटन यांचा अधिक प्रभाव होता.’ जनसामान्य असे समजतात की, भारत स्वतंत्र झाल्यावरही ब्रिटिशांनी त्यांच्या हातात सत्ता रहावी, या उद्देशाने एडविना माऊंटबॅटनला भारतात पाठवले. त्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान नेहरूंशी ठेवलेले संबंध असे दर्शवतात की, ब्रिटिशांनी नेहरूंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वतंत्र भारतावर सत्ता चालवली. त्यामुळे ८०० वर्षे धर्मांध मुसलमानांची जुलमी सत्ता, १५० वर्षे ख्रिस्त्यांनी केलेला भारताचा विद्ध्वंस आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांचाच कित्ता गिरवून हिंदू आणि भारतीय यांची मोठी हानी केली.
४. उर्दू कवी मजरूह सुलतानपुरी आणि प्रसिद्ध अभिनेता बलराज सहानी यांना अटक
डिसेंबर २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात संसदेमध्ये नेहरू, एडविना माऊंटबॅटन आणि ब्रिटनचा भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल यांच्यावरून प्रचंड गदारोळ झाला. त्या वेळी काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देतांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी राज्यसभेत सांगितले, ‘वर्ष १९४९ मध्ये मुंबई कामगारांचा संप चालू होता. त्या वेळी नेहरू मुंबईत आले होते; मात्र त्यांनी या संपाला महत्त्व दिले नाही. उलट या संपाला सहानुभूती व्यक्त करणारे उर्दू कवी मजरूह सुलतानपुरी यांनी नेहरूंवर ‘कॉमनवेल्थचा दास’ (राष्ट्रकुलाचा दास), ‘हिटलरचा दास’ अशी कविता केल्यावर त्यांना चक्क कारागृहात टाकण्यात आले. त्यानंतर त्यांच्या दूतामार्फत त्यांना क्षमायाचना करायला सांगितली; पण त्यांनी क्षमायाचना न केल्यामुळे मजरूह सुलतानपुरी यांना २ वर्षे कारागृहात ठेवले. याच संदर्भात प्रसिद्ध चित्रपट अभिनेते बलराज सहानी यांनी मजरूह सुलतानपुरी यांची बाजू घेतल्याने त्यांनाही कारावास भोगावा लागला होता.
५. नेहरूंवरील पुस्तक आणि चित्रपट यांच्यावर बंदी
वर्ष १९७५ मध्ये मायकल एडवर्ड यांचे ‘नेहरू’ या शीर्षकाखाली जवाहरलाल नेहरू यांच्यावर एक (चरित्र) पुस्तक प्रकाशित झाले; पण काँग्रेस सरकारने या पुस्तकावरच बंदी घातली. एवढेच नाही, तर त्यावर आधारित ‘किस्सा कुर्सिका’ या चित्रपटावरही बंदी घातली. अशा पद्धतीने सर्व शासन यंत्रणा, पोलीस, प्रशासन, अन्वेषण यंत्रणा स्वत:च्या हाताशी ठेवून आपल्या विरुद्ध कुणी बोलत असेल, तर त्याला (गांधी-नेहरू कुटुंबियांनी) संपवले, असे म्हटल्यास वावगे ठरेल का ? सध्या संसदेत जो गदारोळ केला गेला त्यात आणि बाहेर सामाजिक माध्यमांमध्ये नेहरू अन् एडविना माऊंटबॅटन यांचा पत्रव्यवहार, तसेच त्या अनुषंगाने काढलेली ५१ कार्टून यांविषयी जे लिखाण प्रसारित झाले, त्याविषयी भाजपचे खासदार संबित पात्रा म्हणतात, ‘ती पत्रे वाचण्याचा भारतियांचा अधिकार आहे.’
६. नेहरू आणि एडविना यांच्यातील पत्रांविषयी भारतियांमध्ये जिज्ञासा
नेहरू आणि एडविना यांच्यातील पत्रांविषयीच्या वृत्ताला ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘लाईव्ह मिंट डॉट कॉम’, ‘डेक्कन हेराल्ड’ या माध्यमांनी प्रसिद्धी दिली. हा विषय आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांकडून चर्चिला गेला. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट जाणून घेणे, हा भारतीय नागरिकांचा अधिकार नसला, तरी जिज्ञासा निश्चितच आहे. त्यामुळे काँग्रेसजनांनी ती व्यंगचित्रे आणि पत्रे उघड करावीत, असे भारतियांना वाटते.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१८.१२.२०२४)