सांगली, १३ डिसेंबर (वार्ता.) – १० डिसेंबर या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने सांगली येथील तहसीलदार कार्यालयावर हिंदुत्वनिष्ठांनी बांगलादेशी ‘हिंदु न्याय यात्रा’ काढत निदर्शने केली. या वेळी नायब तहसीलदार श्री. मनोहर पाटील यांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील तासगाव, ईश्वरपूर, विटा, सांगली शहर, जत, कवठेमहकांळ या ठिकाणी तहसील कार्यालयांत निवेदन देण्यात आले.
आंदोलनात श्री. गणेश गाडगीळ, सांगली इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान मत्स्य अवतार दास, इस्कॉन उपाध्यक्ष श्री शुभानंद दास, राधा निल माधव दास, श्री. किरण कुलकर्णी, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी श्री. प्रकाश तात्या बिर्जे, हिंदु एकता आंदोलनाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. विष्णुपंत पाटील, उपाध्यक्ष श्री. विजय टोने, विनायक एडके, शिवसेना शिंदे गटाचे श्री. उमाकांत कार्वेकर, भाजप, शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कडेगाव (जिल्हा सांगली) येथेही आंदोलन !मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने कडेगाव येथे मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशामध्ये होणार्या अन्याय, अत्याचाराविरोधात भगवे वादळ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सचिन जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांकडे पुलवामा आक्रमणानंतर ज्या पद्धतीने ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता, अशाच पद्धतीचा बांगलादेशामध्ये होणार्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करावा, जेणेकरून तेथील हिंदूंना संरक्षण मिळेल, अशी मागणी केली. या वेळी भाजपचे नेते श्री. राजाराम गरूड, भगवे वादळ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सचिन जाधव यांनी मनोगत वक्त केले. |