पू. संदीपदादा, द्यावा आशिष आम्‍हा ‘सक्षम’ होण्‍याचा ।

मार्गशीर्ष शुक्‍ल चतुर्थी (५.१२.२०२४) या दिवशी पू. संदीप आळशी यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधकाने त्‍यांच्‍याप्रती व्‍यक्‍त केलेली काव्‍यरूपी कृतज्ञता पुढे दिली आहे. 

पू. संदीप आळशी

मातेसम असे ममता ।
पित्‍यासम असे आधार ॥ १ ॥

दिशा देती साधनापथावर आम्‍हा ।
करण्‍या गुरुकृपायोगानुसार भवसागर पार ॥ २ ॥

ग्रंथसेवेचे श्री गुरूंनी दिले शिवधनुष्‍य ।
पेलून लीलया, ग्रंथसेवेसाठी अर्पिले आयुष्‍य ॥ ३ ॥

श्री. अजित तावडे

‘तमसो मा ज्‍योतिर्गमय ।’ (टीप १), ही प्रार्थना ऐकून ।
ग्रंथज्ञानाचे दीप अंतरी लावून ॥ ४ ॥

राष्‍ट्रजागृती आणि धर्मप्रसार यांसाठी प्रसारसाहित्‍य ।
निर्माण होत असे त्‍यांच्‍या लेखणीतून ॥ ५ ॥

आमची सेवा अन् साधना यांची असे त्‍यांनाच तळमळ भारी ।
प्रगती व्‍हावी आमची, यासाठी धडपड त्‍यांची सारी ॥ ६ ॥

न्‍यून पडतो आम्‍ही त्‍यांना जाणाया ।
क्षमा करा गुरुदेवा आम्‍हा, लेखणी अपुरी त्‍यांचे गुण वर्णया ॥ ७ ॥

प्रयत्न करू आम्‍ही तुम्‍हाला अपेक्षित असे घडण्‍याचा ।
द्यावा आशिष आम्‍हा ‘सक्षम’ (टीप २) होण्‍याचा ॥ ८ ॥

टीप १ – ‘आम्‍हाला अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जा’, अशी ईश्‍वराला केलेली प्रार्थना. (संदर्भ : बृहदारण्‍यकोपनिषद़्, अध्‍याय १, ब्राह्मण ३, वाक्‍य २८)

टीप २ – ग्रंथ आणि कला यांच्‍याशी संबंधित सेवा अधिक गतीने अन् पुढाकार घेऊन करण्‍यास सक्षम

– श्री. अजित तावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक