१. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जातांना आलेल्या अनुभूती
मला ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या एका शिबिराला जायचे होते. तिथे जाण्यासाठी ऐनवेळी भुसावळला येणारी रेल्वे गाडी विलंबाने येणार असल्याने मला दुसर्या गाडीचे आरक्षण (Reservation) करावे लागले. या धावपळीत मला पुष्कळ ताण आला होता. माझे आध्याित्मक त्रासही वाढले होते. मला सामानाची बांधाबाध (Packing) करतांनाही पुष्कळ त्रास झाला. मी घरून निघतांना थोडा पाऊस आला आणि लगेच थांबला. तेव्हा मला वाटले, ‘हा शुभसंकेत आहे.’ मला त्या वेळी प्रसन्न वाटत होते. माझा सगळा ताण निघून गेला. संपूर्ण प्रवासात मला पुष्कळ हलकेपणा जाणवत होता. माझे मन निर्विचार झाले होते. मी रामनाथी आश्रमात कशी येऊन पोचले, ते मला कळलेच नाही.
२. वाढदिवसाच्या दिवशी अधिक मासानिमित्त सद्गुरुद्वयींची (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची) ओटी भरण्याची इच्छा होणे
मी रामनाथी आश्रमात पोचले, त्या दिवशी माझा तिथीने आणि तारखेने वाढदिवस होता. तेव्हा ‘एखाद्या साधिकेची ओटी भरावी’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी मला एका साधिकेने सुचवले, ‘सद्गुरुद्वयी मातांची (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची) ओटी भरावी.’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. मी त्यांच्यासाठी साड्या आणायला जात असतांना मला काहीही सुचत नव्हते. तिथे माझा त्रास वाढला; पण मी प्रार्थना केल्यावर साड्या निवडू शकले. तेव्हा मला शिकायला मिळाले की, ‘ईश्वरासाठी आपण कोणतीही गोष्ट करतांना आपल्या मनाने न करता प्रार्थना करून शरणागतभाव ठेवूनच करावी लागते.’
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची सूक्ष्मातून ओटी भरत असल्याचा भाव ठेवल्यावर गुरुकृपेने प्रत्यक्ष श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन होणे आणि पुष्कळ भावजागृती होणे
मी आश्रमाच्या स्वागतकक्षावर ओटीसाठी आणलेले सर्व साहित्य काढून देत होते. त्या वेळी ‘मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची (दोन्ही मातांची) ओटी भरत आहे’, असा भाव ठेवून मी सर्व कृती करत होते. ओटीचे साहित्य काढत असतांना मला माझ्या मागे चांगली स्पंदने जाणवली. मी मागे वळून बघितले, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांच्या खोलीकडे जातांना मला दिसल्या. आमची भेट झाली. मी हात जोडून त्यांना नमस्कार केला. त्यांनीसुद्धा सर्वांना नमस्कार केला. त्यांचे सुंदर आणि तेजस्वी रूप बघून माझा भाव जागृत झाला. ज्यांची ओटी भरण्याची माझी इच्छा होती, त्यांनीच मला दर्शन दिले. मी त्यांना पहिल्यांदाच पहात होते. ‘मला वाढदिवसाची ही अमूल्य ‘दर्शनभेट’ गुरुदेवांनी दिली’, असे वाटून माझे मन भरून आले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी माझ्यासाठी खाऊ पाठवला. तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते.
मला ही अद्भुत आणि अविस्मरणीय अनुभूती दिल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी आणि सद्गुरुद्वयी मातांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. कांचन शर्मा, अमरावती (६.८.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |