वक्फ बोर्डाचा आणखी एक ‘प्रताप’ !
धारवाड (कर्नाटक) – वक्फ बोर्डाचे नाव भूमींच्या नोंदींमध्ये समाविष्ट करण्यासाठी भूमीच्या नोंदी पालटण्याचे आणखी एक प्रकरण कर्नाटकात समोर आले आहे. धारवाडच्या उप्पिनबेट्टागेरी गावात ३.१३ एकर भूमीचे मालक असलेले शेतकरी मलप्पा मसुथी यांनी वर्ष २०२२ मध्ये कोणतीही नोटीस न देता शेतभूमीच्या नोंदींमध्ये वक्फचे नाव समाविष्ट केल्याचा आरोप केला आहे. धारवाडच्या उप्पिनबेटगेरी गावातील सर्वेक्षण क्रमांक २९ च्या ‘आर.टी.सी.’ प्रतीमध्ये वर्ष २०२२ मध्ये परिवर्तन झाले आहे.
मलप्पा मसुथी यांनी दावा केला आहे की, त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून या भूमीवर शेती करत आहे. ही भूमी त्यांची वडिलोपार्जित भूमी आहे आणि वक्फने यापूर्वी कधीच त्यावर दावा केला नव्हता. आता ‘आर्.टी.सी.’मध्ये वक्फचे नाव आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील गरीब शेतकर्यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवून त्यांच्या भूमी बळकावणार्या वक्फ बोर्डाचे कसून अन्वेषण व्हायला हवे, असेच सर्वसामान्यांना वाटते ! |