भारताला अडचणीत आणण्याची नवनवीन कारणे शोधणारा ‘डीप स्टेट’ !

(टीप : ‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकणारी संस्था)

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

कॅनडा-भारत संघर्षाला जागतिक दृष्टीकोनातून पहा. बांगलादेश-मणीपूर यांच्यानंतर आता भारत-कॅनडा पुन्हा एकदा अमेरिका, ब्रिटन हे देश चर्चेत ! ‘डीप स्टेट’पुरस्कृत भारताला अस्थिर करण्याचा एक जागतिक कट ? भारताचा वाढता जागतिक प्रभाव ‘डीप स्टेट’ला असुरक्षित करणार्‍या कॅनडाला स्वतःचे अस्तित्व नाही. याचा बोलवता धनी अमेरिका ! अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे खलिस्तानी नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. बांगलादेशातील उठावानंतर ‘डीप स्टेट’चा आत्मविश्वास वाढला आहे. भारताला अडचणीत आणण्याची नवनवीन कारणे शोधली जात आहेत. त्यामुळे रशिया हा भारताचा जुना मित्र पुन्हा एकदा उत्तम पर्याय असेल.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक (१९.१०.२०२४)