सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथे नवरात्रीमध्ये झालेल्या ‘दशमहाविद्या’ यागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती

यज्ञ स्थळाचे छायाचित्र

१. श्री. अशोक भागवत, मथुरा सेवाकेंद्र, उत्तरप्रदेश.

श्री. अशोक भागवत

१ अ. आध्यात्मिक लाभ होऊन उत्साह जाणवणे : ‘२४.१०.२०२३ या दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून मला ‘पुष्कळ जांभया येणे आणि ढेकर येणे’, असे त्रास होऊ लागले. त्यानंतर ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण न्यून झाले आहे’, असे मला जाणवले. मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन मला उत्साह जाणवू लागला होता. सायंकाळी यागाचे प्रक्षेपण पहातांना माझे मन स्थिर आणि शांत होते.’

२. कु. रुचि पंवार, जयपूर, राजस्थान.

२ अ. ‘पहिल्या दिवशी प्रक्षेपण चालू झाल्यावर ‘दशमहाविद्या’ यज्ञामुळे माझ्या षट्चक्रांची शुद्धी होणार आहे’, असे मला जाणवले.

२ आ. ‘छिन्नमस्तादेवीने स्वतःच्या हातातील शस्त्र उचलून स्वतःचे मस्तक धडापासून वेगळे केले आहे, त्याचप्रमाणे आपल्याच प्रयत्नांनी आपल्याला अहं निर्मूलन करायचे आहे’, असे लक्षात येणे : दुसर्‍या दिवशी जेव्हा देवीचे चित्र पडद्यावर पाहिले, तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेव या रूपातून सांगत आहेत की, आपले स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी ज्या प्रकारे छिन्नमस्तादेवीने स्वतःच्याच हातातील शस्त्र उचलून स्वतःचे मस्तक धडापासून वेगळे केले आहे, त्याच प्रकारे स्वतःच्या प्रयत्नांनी, म्हणजेच क्षात्रतेजाने आपल्याला अहं निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. पुढे देवीच्या स्वरूपाचे वर्णन करतांना सूत्रसंचालकाने अगदी तसेच सांगितले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कृपेनेच ते माझ्या लक्षात येऊ शकले, याविषयी कृतज्ञता वाटली.

कु. रुचि पंवार

२ इ. ‘मूलाधारचक्राची शुद्धी होऊन ती पुढे स्वाधिष्ठानचक्राकडे जात आहे’, असे जाणवणे : त्याच यज्ञात जेव्हा मंत्रोच्चारासह आहुती दिली जात होती, तेव्हा मला असे जाणवले की, ‘माझ्या मूलाधारचक्राची शुद्धी होऊन ती पुढे स्वाधिष्ठानचक्राकडे जात आहे. तेव्हा गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, आपण मला मनातील षड्‌रिपुरूपी वाईट शक्तींच्या नाशासाठीच या यज्ञाच्या प्रक्षेपणाला जोडण्याची आणि मंत्रांसह आहुती देतांना पहाण्याची संधी दिली आहे आणि आपणच हे सर्व करून घेत आहात.’’

२ ई. निर्विचार अवस्था आणि शांती अनुभवणे : नवव्या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यापूर्वी आवरण काढल्यानंतर माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘गुरुदेव, आपणच या यज्ञाच्या माध्यमातून माझ्या षड्चक्रांची शुद्धी होऊदे.’ त्या वेळी ‘सहस्रारावर एखादी लहर वेगाने येत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर माझ्या मनात कोणतेच विचार आले नाहीत. जेव्हा यंत्राचा सूक्ष्मातील प्रयोग झाला, तेव्हा मला शांत वाटत होते आणि वेगळे काहीच जाणवत नव्हते. नंतर त्या यंत्राचा प्रभाव सहस्रारावर झाला.

२ उ. ‘मन एकाग्र होत आहे’, असे जाणवणे : दहाव्या दिवशी यज्ञाला संगणकीय प्रणालीद्वारे जोडल्यानंतर ‘माझ्या मनातील विचार न्यून होऊन माझे मन एकाग्र होत आहे’, असे मला जाणवले. त्या दिवशीच्या देवतेशी संबंधित यंत्र पाहून आतमध्ये पोकळी जाणवत होती. नंतर ‘श्री कमलादेवीच्या शक्तीमुळे हे होत आहे’, असे सूत्रसंचालनात सांगितले.

तिन्ही मोक्षगुरूंच्या कृपेने मला प्रत्येक दिवशी ‘यज्ञाशी संबंधित देवतेचे यंत्र आणि त्याच्या माध्यमातून कार्यरत देवीची शक्ती अन् आमच्यावर होत असलेली गुरुकृपा’, यांचा संगम अनुभवता आला, याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

३. कु. मनीषा माहुर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मथुरा सेवाकेंद्र, उत्तरप्रदेश.

कु. मनीषा माहुर

३ अ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही साक्षात् लक्ष्मीच्या रूपात सालंकृत होऊन समोरच आहेत’, असे जाणवणे : जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या यज्ञकुंडाजवळ उपस्थित होत्या, तेव्हा माझी प्रार्थना होत होती. प्रार्थना करताच ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही साक्षात् लक्ष्मीच्या रूपात सालंकृत होऊन माझ्या समोरच आहेत’, असे मला जाणवले. ‘त्यांच्या चरणी मी याचना करत आहे’, असा भाव माझ्या मनात दाटून येत होता. या यज्ञाच्या वेळी पहिल्यांदाच माझी भावजागृती झाली.

३ आ. जणू एखादी आई आपल्या लहानशा मुलाच्या मस्तकावरून हात फिरवून त्याला आरतीचे चैतन्य देते, त्याप्रमाणे ‘श्रीकृष्ण आरती घेऊन आला आहे’, असे जाणवणे : आरतीच्या वेळी ‘भगवान श्रीकृष्ण माझ्याकडे आरती घेऊन आले आहेत आणि त्यांच्या हातून मी आरती ग्रहण करत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘एखादी आई आपल्या लहानशा मुलाच्या मस्तकावरून हात फिरवून त्याला आरतीचे चैतन्य देत आहे’, असेही जाणवले. त्या वेळीही मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. आरतीनंतर गायन सेवेच्या वेळी जणू ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींसाठीच ही गायन सेवा चालली आहे. तसेच त्यांच्याकडे बघतांना त्यांना पहातच रहावे’, असे मला वाटत होते आणि त्यांच्याप्रती आर्तभाव जाणवत होता अन् भावजागृतीही झाली.

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कृपेमुळेच मी हे अनुभवू शकले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

४. श्री. श्रीराम लुकतुके (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मथुरा सेवाकेंद्र, उत्तरप्रदेश.

श्री. श्रीराम लुकतुके

४ अ. प्रवासात गाडीत बसून संगणकावर कार्यक्रम पहातांना ‘इंटरनेट’ बंद पडणे; मात्र इंटरनेट पुन्हा आरंभ होणे आणि कार्यक्रम पूर्ववत दिसणे’, यातून बुद्धीच्या स्तरावर हे अशक्य असूनही गुरुकृपेने ते शक्य होणे : ‘२३.१०.२०२३ या दिवशी मी एका सेवेसाठी बाहेर गेलो होतो. परत येत असतांना यज्ञाला आरंभ झाला होता. सेवा झाल्यानंतर परतीच्या प्रवासात गाडीत बसून संगणकावर यज्ञ पहात होतो. तेव्हा अंतिम गायनाची वेळ झाली होती. गायन आरंभ झाल्यानंतर संगणकाचे ‘इंटरनेट’ बंद पडले. दुसर्‍या भ्रमणभाषवरून जोपर्यंत ते चालू करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत गायन सेवा समाप्त होत आली होती. आम्हाला वाटले, आता तर हे आम्हाला पहायला मिळू शकले नाही, यामध्ये भगवंताचीच काहीतरी इच्छा असेल. आम्ही थोडसे पुढे गेलो असता संगणकामध्ये गायन सेवा आपोआप चालू झाली आणि ते गायन मी संपूर्ण ऐकले. जशी गायन सेवा संपली, त्या क्षणी संगणकाचे ‘इंटरनेट’ बंद पडले. तिन्ही मोक्षगुरूंच्या कृपेमुळेच मी ते ऐकू शकलो. तसे पहाता ‘कोणताही संगणकीय प्रणालीद्वारे दाखवणारा कार्यक्रम इंटरनेट बंद पडल्यानंतर पुन्हा आरंभ होणे आणि पूर्ववत् दिसणे’, असे होऊच शकत नाही. त्यातही मी ज्या ठिकाणी होतो, तेथे तर ‘इंटरनेटची रेंजच’ नसते. ‘बुद्धीने जे अशक्य वाटते, ते केवळ गुरुकृपेमुळेच शक्य होते’, हे यातून शिकायला मिळाले. गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला गायन सेवा ऐकायला मिळाली, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १२.११.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक