‘श्रावण शुक्ल तृतीया (७.८.२०२४) या दिवशी श्री. चेतन धनंजय राजहंस, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त रामनाथी, (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधकवृद्धी शिबिरात साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्री. चेतन राजहंस यांनी शिबिरात साधकांना मार्गदर्शन केले होते.
श्री. चेतन राजहंस यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. सौ. शुभांगी महाजन, कोल्हापूर.
१ अ. श्री. चेतन राजहंस यांच्या जागी गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हेच) बसली असून तीच शिकवत आहे’, असे जाणवणे : ‘श्री. चेतनदादा शिबिराच्या एका सत्रात बोलत असतांना प्रत्यक्ष गुरुमाऊलीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हेच) त्यांच्या जागी बसली असून ‘तीच आम्हाला शिकवत आहे’, असे मला जाणवले. ‘चेतनदादाने शिकवलेले माझ्या अंतर्मनात गेले आहे’, असे मला वाटले.’
२. सौ. मानसी मधुसूदन सोन्ना, पुणे.
२ अ. चेतनदादांमध्ये ‘शिबिराचा सर्वांना लाभ कसा होईल ? आणि सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती कशी होईल ?’, याची तळमळ असणे : ‘मला श्री. चेतनदादांमध्ये प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) २ – ३ वेळा दर्शन झाले. मला त्यांच्यातील प्रेमभाव जाणवला. ‘शिबिरातील सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती कशी होईल ? प.पू. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संकल्पाची पूर्ती कशी होईल ? त्याचा सर्वांना लाभ कसा होईल ?’, यांची तळमळ मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली. ‘संपूर्ण शिबिर एका वेगळ्याच लोकांत चालू आहे’, असे मला जाणवत होते. माझी क्षमता नसतांनाही केवळ गुरुकृपेमुळे मला शिबिरात सहभागी होता आले.’
३. सौ. वृंदा सटाणेकर, कोथरूड, पुणे.
३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे : ‘चांगला सेवक होण्याच्या दृष्टीने श्री. चेतनदादा विषय घेत असतांना पांढर्या शुभ्र वेशातील गुरुमाऊलीचे दर्शन झाले. ‘त्यांनी सांगितलेले प्रत्येक सूत्र हृदयावर कोरले जात आहे’, याची मला अनुभूती आली आणि माझी भावजागृती झाली.’
४. सौ. स्मिता माईणकर, सांगली
४ अ. ‘तत्त्वनिष्ठ राहून स्पष्टपणे आणि प्रेमाने संबंधित साधकांकडून होणार्या चुका आणि त्यांचे स्वभावदोष कसे सांगायला पाहिजेत ?’, हे लक्षात येणे : श्री. चेतनदादांनी संबंधित साधकांकडून झालेल्या चुकांसंदर्भात सत्संग घेतला. तेव्हा मला त्यांच्या बोलण्यात सहजता आणि प्रेमभाव जाणवत होता. त्यामुळे चुकांविषयी बोलणे होत असले, तरी मला वातावरणात दाब जाणवत नव्हता. मला आनंद जाणवत होता. दादांमध्ये इतरांना साहाय्य करण्याची पुष्कळ तळमळ जाणवली. ‘आवश्यक तेथे तत्त्वनिष्ठ राहून स्पष्टपणे आणि प्रेमाने संबंधित साधकांकडून होणार्या चुका आणि त्यांचे स्वभावदोष कसे सांगायचे ?’, हे माझ्या लक्षात आले.
४ आ. ‘सहजता, प्रेमभाव, तत्त्वनिष्ठपणा, इतरांना साहाय्य करणे, गुरुकार्याची तळमळ, सतत प्रसन्न चेहरा’, असे अनेक गुण माझ्यामध्ये आणले पाहिजेत’, हे मला शिकायला मिळाले.’
५. सौ. राजश्री गडेकर, म्हापसा, गोवा.
५ अ. श्री. चेतनदादा बोलत असतांना मला ‘प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.’
६. सौ. ज्योत्स्ना नारकर, सिंधुदुर्ग
६ अ. ‘‘श्री. चेतनदादा बोलत नसून प.पू. गुरुदेवच बोलत आहेत’, असे मला अनेक वेळा जाणवले. मी त्यांचे बोलणे श्रद्धायुक्त अंतःकरणाने ऐकत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.२.२०२४)
|