Assam Hate Speech : कट्टर इस्लामी धर्मगुरु मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरी यास अटक !

आसाम पोलीस आणि प्रशासन यांच्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे प्रकरण  

(मुफ्ती म्हणजे शरीयत कायद्यानुसार न्यायनिवाडा करणारा)

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरी

गौहत्ती – पोलीस आणि प्रशासन यांच्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी कट्टर इस्लामी धर्मगुरु मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरी यास २ जुलैला अटक केली. त्याने सामाजिक माध्यमांद्वारे लखमीपूर पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांना हिंसक आंदोलन करण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही, तर ६ ते १० जुलै या कालावधीत आसाममध्ये राज्यव्यापी नाकेबंदी आणि निदर्शने करण्याची धमकीही  दिली होती.

धाडस असेल, तर आम्हा थांबवून दाखवा ! – मुफ्तीचे चिथावणीखोर आव्हान

मौलाना मुस्तफा कमाल यांनी मुसलमानांना ईदनिमित्त गायींची कुर्बानी (हत्या) न देण्याचे आवाहन केले होते. आसाममधील कट्टरवाद्यांनी त्यांच्या आवाहनाला विरोध करत मौलाना मुस्तफा कमाल यांच्या अटकेची मागणी केली होती. त्या वेळी ‘मुफ्ती मुकीबुर रहमान अजहरी याने ‘आम्ही मौलाना मुस्तफा कमाल यांच्या घरासह पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांना घेराव घालू. ज्याच्यामध्ये धाडस आहे, त्यांनी आम्हाला रोखून दाखवावे’, असे चिथावणीखोर आव्हान केले होते.

अझहरीने मौलाना मुस्तफा कमाल यांना धमकी देत म्हटले की, ‘आसाम ही कुणाच्या बापाची संपत्ती नाही. तुम्ही इस्लाम, कुराण आणि पैगंबर यांचा अपमान केलात, तर आम्ही गप्प बसणार नाही.’ सामाजिक माध्यमांवर हा प्रक्षोभक व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरी यास अटक केली.

संपादकीय भूमिका

एरव्ही ‘हिंदुत्वनिष्ठांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते’, अशी निष्कारण ओरड करणारे आता ‘अशा कट्टरवाद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते’, असे म्हणत नाहीत ?