Muslims Rename Village Name : नेपाळमध्‍ये मुसलमानांनी हिंदूबहुल गावाचे नामकरण केले ‘इस्‍लामनगर !

हिंदूंनी नामफलक तोडल्‍यावर मुसलमानांनी हिंदु तरुणांना केली अमानुष मारहाण !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील रौतहाट जिल्‍ह्यात आठवड्याभरापूर्वी मुसलमानांनी एका गावाचे नाव ‘इस्‍लामनगर’ ठेवल्‍याने तणाव निर्माण झाला आहे. या नावाचा फलकही लावण्‍यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंदूंनी याचा निषेध करत नामफलक काढून टाकला. यामुळे मुसलमानांनी काही हिंदु तरुणांना मारहाण केली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्‍थळी आले आणि त्‍यांनी परिस्‍थिती नियंत्रणात ठेवली.
रौतहाट जिल्‍ह्यातील गरुड नगरपालिका प्रभाग क्रमांक ६ मधील पोथ्‍याही या गावातील एका चौकात मुसलमानांनी ‘इस्‍लामनगर’ असा फलक लावला होता. या फलकाला हिरवा रंग दिला होता. त्‍यावर अरबी आणि उर्दू भाषेत अनेक शब्‍द लिहिलेले होते. फलकाच्‍या दोन्‍ही बाजूला इस्‍लामी प्रार्थनास्‍थळांची चित्रेही रेखाटण्‍यात आली होती. येथे उभे राहून एका मुसलमान वृद्धाने सेल्‍फी काढून सामाजिक माध्‍यमांत प्रसारित केला. त्‍यानंतर स्‍थानिक मुसलमान या गावाला ‘इस्‍लामनगर’ असे संबोधू लागले.

गावात आहेत केवळ ४ टक्‍के मुसलमान !

नेपाळमधील ‘हिंदु सम्राट सेना’ या संघटनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजेश यादव यांनी एका वृत्तसंकेतस्‍थळाला या विषयी माहिती देतांना सांगितले की, पोथ्‍याही गावात मुसलमानांची केवळ १० घरे आहेत, जी गावाच्‍या एकूण लोकसंख्‍येच्‍या केवळ ४ टक्‍के आहेत. (४ टक्‍के मुसलमान असे करत असतील, तर हिंदू ‘हिंदु’ म्‍हणून जगण्‍याच्‍या लायकीचे आहेत का ? असा प्रश्‍न उपस्‍थित होतो. – संपादक) असे असतांनाही त्‍यांनी संपूर्ण पोथ्‍याही गावाचे नाव पालटण्‍याचा कट रचला होता. २३ जून या दिवशी हिंदु सम्राट सेनेच्‍या सदस्‍यांनी स्‍थानिक नागरिकांसह इस्‍लामनगरमध्‍ये हा फलक काढून टाकला. त्‍या वेळी मुसलमान गप्‍प होते; पण अंतर्गतरित्‍या त्‍यांनी हिंसाचार करण्‍याचा कट रचला होता. २५ जूनच्‍या रात्री ३ हिंदु युवक चौकातून जात होते. या वेळी त्‍यांना १२ हून अधिक मुसलमानांनी घेरले आणि फलक काढण्‍याचा आरोप करत प्रथम शिवीगाळ आणि नंतर मारहाण केली. यात तरुण गंभीररित्‍या घायाळ झाले. त्‍यांना उपचारार्थ रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे. मारहाण करणार्‍यांमध्‍ये चांद दिवाण, रफिक, सिराजुल, मंजूर आदींचा समावेश होता. मारहाणीची माहिती मिळताच हिंदू संतप्‍त झाले आणि त्‍यांनी निषेध केला. तसेच पोलीसही तेथे पोचले.

मारहाण करणार्‍या मुसलमानांनाच पोलिसांचे संरक्षण !

हिंदु तरुणांना मारहाण करणार्‍या मुसलमानांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. (भारतातील पोलीस जे करतात, तेच नेपाळमधील पोलीसही करत आहेत ! – संपादक) एवढेच नाही, तर पोलिसांनी ज्‍या मुसलमानांनी मारहाण केली त्‍यांना संरक्षण दिले. नेपाळ प्रशासन या घटनेला ‘परस्‍पर वाद’ म्‍हणत प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात कोणतेही धार्मिक कारण नसल्‍याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे; मात्र हिंदु संघटनांनी पोलीस हे प्रकरण दडपण्‍याचा प्रयत्न असल्‍याचे म्‍हटले आहे.

हिंदु संघटनांचे म्‍हणणे आहे की, अधिकारी नेपाळमधील साम्‍यवादी राजकीय पक्षाच्‍या  दबावाखाली काम करत आहेत. सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत.

हिंदु सम्राट सेनेचे राजेश यादव यांनी सांगितले की, आम्‍ही आणि इतर काही संघटना सरकारला निवेदन देणार आहेत. या निवेदनात गावाचे नाव पालटून इस्‍लामनगर करण्‍याच्‍या षड्‌यंत्राचा निषेध करण्‍यात येणार असून हिंदु तरुणांना मारहाण करणार्‍या मुसलमानांवर कारवाई करण्‍याची मागणी करण्‍यात येणार आहे.

कदम चौकाचे नाव केले ‘मदरसा चौक’ !

राजेश यादव यांनी असेही सांगितले की, ३ महिन्‍यांपूर्वी रौतहाट जिल्‍ह्यातील याच गरुडा नगरपालिकेतील जयनगर भागात मुसलमानांनी असाच कट रचला होता. त्‍यानंतर काही मुसलमानांनी कदम चौकाचे नाव पालटून ‘मदरसा चौक’ केले. येथे एक फलकही लावण्‍यात आला. तो अजूनही तेथे आहे. या प्रभागाचा अध्‍यक्ष शेख वहाब आहे. (धर्मनिरपेक्ष नेपाळमधील इस्‍लामी राज्‍य ! मुसलमान जेथे प्रमुख असतात तेथे कधीही धर्मनिरपेक्षता राहू शकत नाही, ते इस्‍लामी राज्‍यच असते ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

हिंदूबहुल नेपाळमधील ही स्‍थिती हिंदूंनाच लज्‍जास्‍पद आहे ! पुढील काही दशकांत हिंदू भारत, नेपाळ पाकिस्‍तान, बांगलादेश, येथून नामशेष झाल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !