Pakistan Biggest Terrorism Exporter : पाकिस्तान आतंकवादाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार !

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्‍या पाकला भारताने फटकारले !

भारताच्या सचिव अनुपमा सिंघन

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्यावर भारताने पाकिस्तानला फटकारलेे. भारताच्या सचिव अनुपमा सिंघन यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांवर सातत्याने होत असलेली दडपशाही आणि आतंकवाद यांचे सूत्र उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, पाकिस्तानने पुन्हा भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी या व्यासपिठाचा वापर केला आहे. ‘भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरमधील जनतेचा वाढलेला सहभाग’, हेच पाकच्या आरोपांना मिळालेले उत्तर आहे. जगातील आतंकवादाचा सर्वांत मोठा निर्यातदार बनणे, हे पाकचे यश आहे. तेेथे अल्पसंख्यांकांसह अनेक मुसलमानांवर अत्याचार होतात. पाकिस्तानने स्वतःचे घर व्यवस्थित ठेवावे.

यापूर्वी फेब्रुवारीमध्येही भारताने येथे पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्‍या तुर्कस्तानलाही प्रत्युत्तर दिले होते. ‘भारताच्या अंतर्गत गोष्टींवर भाष्य करू नये’, असा दम भारताने तुर्कस्तानला दिला होता.

संपादकीय भूमिका

भारताने पाकला शाब्दिक उत्तरे देण्यापेक्षा आता थेट युद्धभूमीवर उत्तर देऊन त्याला जागतिक नकाशावरून नष्ट केले पाहिजे !