डेहराडून – विविध वनक्षेत्रांतील राखीव जंगलांना आग लावणार्या ६ आरोपींना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. यामध्ये एका नेपाळी कामगाराचा समावेश आहे. लॅन्सडाऊन वनविभागाच्या कोटद्वार भागात पकडलेल्या नेपाळी कामगाराला कारागृहात पाठवण्यात आले आहे, तर अन्य आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
गढवाल वनविभागाचे विभागीय वनअधिकारी स्वप्नील अनिरुद्ध यांनी सांगितले की, खुर्सजवळील राखीव जंगलात आग लावणार्या ५ जणांना गस्तीवर असलेल्या वन पथकाच्या कर्मचार्यांनी पकडले. मोसर आलम, नजेफर आलम, फिरोज आलम, नुरुल आणि शालेम अशी आरोपींची नावे असून ते बिहारचे रहिवासी आहेत.