Pakistani Spy Arrested : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या महंमद सकलेन याला गुजरातमधून अटक

आरोपी महंमद सकलेन

कर्णावती (गुजरात) – गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने महंमद सकलेन नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये हेरगिरी करणार्‍या एका टोळीला पकडण्यात आले होते; मात्र सकलेन पसार होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

या टोळीकडून भारतीय सैनिकांच्या भ्रमणभाष संचावर ‘व्हायरस’ पाठवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. तसेच संशयास्पद ‘लिंक्स’ पाठवून भ्रमणभाष ‘हॅक’ केला जात होता आणि त्यातील माहिती पाकिस्तानला पाठवली जात होती. जेव्हा हे उघड झाले, तेव्हा महंमद सकलेन याच्या क्रमांकावरून ही हेरगिरी केली जात असल्याचे समोर आले होते.