चिपळूण – रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाने तालुक्यातील खेर्डीसह शहरातील मार्कंडी परिसरातून ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. हे घुसखोर बंगालमार्गे कोलकात्याहून महाराष्ट्रात घुसल्याचे पोलीस अन्वेषणातून उघड झाले आहे. या बांगलादेशींकडे कोणतीही कागदपत्रे सापडली नसल्याने त्यांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पारपत्र भारत प्रवेश नियम १९५० चा नियम ३ सह ६ परकीय नागरिक आदेश १९४८ परि.३ (१) अ, परकीय नागरिक आदेश १९४६ कायदा कलम १४ सह गुन्हा नोंदवेला आहे.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाने शहराजवळील खेर्डी येथून रुख्साना आलमगीर मंडल आणि आलमगीर अरबली मंडल या २ बांगलादेशी पती-पत्नीला अटक केली होती. यानंतर लगेचच महंमद हसनअली आणि असाद कामरू जवान सिरीना या आणखी २ बांगलादेशींना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ? |