भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण येथे हिंदू बहुसंख्य आहेत ! – शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

देशातील नेहरूंची धर्मनिरपेक्षता संपली आहे. तिहेरी तलाक, शाहबानोवाली धर्मनिरपेक्षता संपली आहे आणि ती कधीही परत येणार नाही. ती धर्मनिरपेक्षता संपली आहे, जी म्हणायची की, रस्त्यावर मुसलमानांचा ताबूत येऊ शकतो; पण दुर्गापूजा यात्रेला अनुमती नाही. फाळणीला योग्य ठरवणारी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी धर्मनिरपेक्षता संपली आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण देशात हिंदू बहुसंख्य आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केले.

‘भारतात धर्मनिरपेक्षता संपली आहे का ?’, या विषयावर ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४’ मध्ये वादविवाद आयोजित करण्यात आला होता. या विषयाला विरोध करतांना पुनावाला म्हणाले, ‘तमिळनाडूचे मंत्री स्टॅलीनचे वक्तव्य धर्मनिरपेक्षता आहे आणि आपण म्हटले की, ‘सर तनसे जुदा’ (शिरच्छेद) म्हणू नका, तर ते जातीयवादी आहेत ? इफ्तारच्या मेजवान्या धर्मनिरपेक्ष आणि श्रीराममंदिराची प्राणप्रतिष्ठा ही सांप्रदायिक असते ? भारत नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिला आहे; कारण येथे हिंदू बहुसंख्य आहेत आणि हिंदू धर्मनिरपेक्ष आहेत.’’