सनातनच्या ग्रंथमुद्रणाची १ कोटी संख्येकडे वाटचाल !

अ. फेब्रुवारी २०२४ पर्यंत सनातनचे ३६५ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. यांतील अनेक ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी आणि नेपाळी या १३ भाषांत ९५ लाख ९६ सहस्र प्रती आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. लवकरच १ कोटी प्रतींचे मुद्रण पूर्ण होईल ! एखाद्या आध्यात्मिक संस्थेच्या ग्रंथांच्या एवढ्या प्रती मुद्रित होणे, ही गोष्ट विरळ म्हणावी लागेल !

आ. अजूनही ५,००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील, एवढे लिखाण गुरुदेवांनी संगणकात विषयांनुसार वर्गीकरण करून ठेवले आहे.