‘ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे; पण यामध्ये सर्वांत मोठा अडथळा असतो तो मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा ! विविध साधनामार्ग आणि संप्रदाय मन, बुद्धी, चित्त अन् अहं यांबाबत बरीच तात्त्विक माहिती सांगतात. विविध ग्रंथांच्या माध्यमातूनही ही माहिती उपलब्ध असते. अनेक जण जिज्ञासेपोटी ती अभ्यासण्यासाठी अनेक वर्षेही देतात; पण या अभ्यासाची फलनिष्पत्ती मात्र काहीच नसते. यासाठी सनातन संस्था ‘मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा लय कसा करायचा ?’, हेच प्राधान्याने शिकवते. असे शिकवणारी सनातन संस्था एकमेव आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले