१. स्वपिती गिरिगर्भे हरिपतिः।
‘या सनातन हिंदु धर्माच्या प्राचीन संस्कृतीचा सिंह आपल्या गुहेत झोपला आहे. याची झोप कधी पुरी होणार ?
२. हिंदूंनी काळानुसार नवीन पाटी लिहिणे आवश्यक !
वीर सावरकर म्हणत असत, ‘‘आपण नवीन पाटी लिहिली पाहिजे.’’ वर्ष १९३७ ते १९४७ या काळात सावरकर यांनी गांधीजींच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात नवीन पाटी लिहिली होती. तिचेच अनुकरण करणे अगत्याचे होते. आजच्या संदर्भात हिंदूंच्या नवीन वाटचालीची पाटी आता लिहिली गेली पाहिजे. काळ कुणासाठी थांबत नाही. येणार्या काळाची पावले ओळखून हिंदूंचे संघटन झाले नाही, तर त्याला ईश्वरही वाचवू शकणार नाही.’
– श्री. शंकर दत्तात्रेय गोखले, अध्यक्ष-संपादक, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई. (साभार : ‘स्वातंत्रवीर’ ऑगस्ट २००५)